क्षेत्रभेट अहवाल
विषय – मराठी उपक्रम अंतर्गत सायकल दुरुस्ती दुकानास भेट
दिनांक – 06/08/2025
वर्ग – इयत्ता 6 वी
दिनांक 06 ऑगस्ट 2025 रोजी इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी विषयाच्या उपक्रमांतर्गत जठारपेठ अकोला येथील दिवेकर चौकातील ‘राहुल सायकल शॉप’ या सायकल दुरुस्तीच्या दुकानास शैक्षणिक भेट दिली. या दुकानाचे मालक श्री. राहुल पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व सायकल दुरुस्तीच्या विविध कामांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सायकल शॉपमधील विविध साधनांचे निरीक्षण केले व त्याचा उपयोग समजून घेतला. सायकल दुरुस्ती करताना वापरण्यात येणारी साधने, सायकलचे भाग आणि त्यांच्या कार्यपद्धती याविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.
दुकानातील विविध प्रकारच्या सायकली, त्यांची रचना, उपयोगिता, तसेच दुरुस्तीचा खर्च याबाबत श्री. पिंगळे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करून दाखवली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयोगी ठरली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेतले व सायकल दुरुस्तीबाबत मूलभूत ज्ञान प्राप्त केले.
