एम.टी.एस.( जळगांव ) परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश  

एम टी एस जळगांव यांच्या तर्फे २०२२-२०२३ या सत्रात घेण्यात आलेल्या  स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत वर्ग २ री तील पार्थ गणेश तिहिले केंद्रातून २ रा राज्यातून १२ वा,पार्थ विक्रम घाईट केंद्रातून ३ रा राज्यातून १३ वा, रचित स्वप्निल मानभेकर केंद्रातून ६ वा राज्यातून १८ वा, वर्ग ३ रा चा तन्मय सचिन ताडे राज्यातून ३ रा केंद्रातून १ ला, गार्गी पराग देशमुख राज्यातून १८ वी, केंद्रातून ७ वी, आदिश मयूर देशमुख राज्यातून १८ वा, केंद्रातून ७ वा, वर्ग ४ थी ची श्रीयश  विनायक पाठक राज्यातून ८ वा, केंद्रातून १ ला, स्वरा प्रफुल्ल भालतिलक राज्यातून १६ वी, केंद्रातून ३ री, समृद्धी सुधीर भगत राज्यातून २१ वी, केंद्रातून ६ वी, अमृता नरेंद्र सुरे राज्यातून २१ वी, केंद्रातून ६ वी, रुपश्री दिनेश पांडव राज्यातून २३ वी, केंद्रातून ७ वी, वर्ग ७ वी चा श्रीप्रसाद पंकज देशमुख याने अकोला केंद्रातून ३ रा व राज्यातून ११ वा  क्रमांक तर आयुष गजानन जळमकर व शौर्य राजीवकुमार मोकळकर यांनी अकोला केंद्रातून ५ वा व राज्यातून १३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. अदिती शंकर पाटील ही केंद्रातून ८ वी व राज्यातून १६ व्या स्थानावर आहे. वर्ग ६ वी ची राजस्वी नारायण शेकोकार अकोला केंद्रातून २ री राज्यातून ९ वी तर प्रणव सतीश नवले  याने अकोला केंद्रातून ६ वा व राज्यातून १७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.  

सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, प्राथामिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.