‘आहार शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करतो’ — डॉ. दिशा पंडित  

आपल्या देशात वेदकालपासून योगपरंपरा सुरु आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक विकासासाठी योगाभ्यास खूप आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या, तणावपूर्ण, व्यस्त दिनचर्येत योग साधनेला वेळ देणे अत्यंत  गरजेचे झाले आहे.  संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यानुसार भारतात देखील  ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो . आपल्या शाळेत देखील सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये  योग प्रशिक्षणाद्वारे योगासनाचे महत्व रुजवले जाते.  योगदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक जठारपेठ परिसरातील ब्राहमण सभा संकुलांतर्गत  बाल शिवाजी माध्यमिक शाळेत आज दिनांक मंगळवार दिनांक २१ जून ला योग शिबिराचा समारोप व योग दिन साजरा करण्यात आला.  

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दीशा पंडित उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. शाळेची विद्यार्थिनी गीत परळीकर हिने प्राणायाम व सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. आर्या कराळे हिने योगासनाचे फायदे आपल्या भाषणातून सांगितले. तसेच अवनी देशपांडे हिने योग प्रवेश वर्गातील आपले अनुभव, झालेले फायदे आपल्या भाषणातून  सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा. डॉ. दिशा पंडित यांनी निरामय आरोग्यासाठी आरोग्याचा मूलमंत्र, योग्य आहार, संयम, योगासनं या सगळ्याचे महत्व विशद केले. ‘आहार शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करतो’ असे मत व्यक्त केले. तसेच आहारात  षड् रसाचा  समावेश असावा, जंक फूड टाळावे अशा विविध गोष्टीचें मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक श्री. जोध सर यांनी  योग प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित केला आणि योगाभ्यासाचे महत्व आणि सातत्य दैनंदिन जीवनात आवश्यक आहे. असे मत त्यांनी याप्रसंगी  व्यक्त केले.  योगप्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक संस्कृती पाठक व संदेश खडसे यांनी प्राप्त केला. व्दितीय क्रमांक सुबोध पाठक याने प्राप्त केला आणि ईश्वरी म्हैसने हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

 याप्रसंगी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, शाळेच्या बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, शाळेतील शिक्षिका व पालकांचाही  सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका किरण मुरमकर तसेच प्रमुख अतिथींचा परिचय शाळेतील शिक्षिका सौ. पौर्णिमा जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. स्वाती बापट यांनी केले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.