अवंती दीपक बांबलकरचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत द्वैपदरी सुवर्ण विजय….
बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला. येथील अवंती दीपक बांबलकर हिने ‘महाराष्ट्र राज्य कराटे ६ वी चॅम्पियनशिप २०२५-२६’ मध्ये विलक्षण कामगिरी करत दोन सुवर्णपदके मिळवून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. महाराष्ट्र अॅमेच्युअर कराटे असोसिएशन आयोजित व NKF कराटे-डो फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त ही स्पर्धा दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे पार पडली.
२९ नोव्हेंबर रोजी अवंतीने Event – Kumite, Weight: 26 kg, Age Group: 8 to 9 years या गटात दमदार प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.
त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी Event – Kata, Age Group: 8 to 9 years या गटातही तिने अचूकता, संतुलन आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवीत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावे केले.
स्पर्धेतील दोन्ही प्रकारांमधील उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल अवंतीचा प्रमाणपत्रे व सुवर्णपदकांनी सत्कार करण्यात आला.
तिच्या या दुहेरी सुवर्णयशाबद्दल शाळेच्या वतीने हार्दिक- हार्दिक अभिनंदन
