अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात  बाल शिवाजीची संस्कृती पाठक हिची राज्यस्तरासाठी निवड 

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेची वर्ग १० वीची विद्यार्थिनी कु. संस्कृती विनायक पाठक हिची अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या सादरीकरणाचा विषय ‘Millet a superfood or a diet fad’ हा आहे. या स्पर्धेतील प्रथम फेरीत तालुका स्तरावर ४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात तिने प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर झालेल्या जिल्हा स्तरावर निवड फेरीत तिने २२ विद्यार्थ्यांमधून तिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला व तिची निवड विभागीय स्तरावर झाली. या विभागीय फेरीत १० विद्यार्थी सहभागी झाले होते.  संस्कृतीने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. संस्कृतीची राज्यस्तरासाठी निवड झाली असून रत्नागिरी येथे ती आपले पुढील सादरीकरण करणार आहे. यात मिळविलेल्या सुयशाबद्दल  Panjabrao Deshmukh Science Innovation & Activity Centre, Amravati  यांच्या तर्फे तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

संस्कृतीने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर,बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षक वृंद  व कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.