अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित संबोध  व गणित प्रज्ञा परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश…..

 अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित गणित संबोध परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे.

या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील तन्मय सचिन ताडे याने अकोला शहरातून प्रथम क्रमांक मिळवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे. लावण्या ललित वक्टे हिला द्वितीय क्रमांकाने यशस्वी ठरली आहे. या व्यतिरिक्त, गणित प्रज्ञा परीक्षेत इयत्ता पाचवीतील तन्मय सचिन ताडे याने आपली छाप सोडली आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत त्याने शिष्यवृत्ती व सुवर्ण पदक प्राप्त केले असून गोल्डन कॅटेगिरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. इतर विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी करत सिल्वर कॅटेगिरीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये इयत्ता पाचवीतील गार्गी पराग देशमुख, अवनीश मुकेश निचळ, अद्वैत प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच इयत्ता आठवीतील राजस्वी नारायण शेगोकार, प्रणव सतीश नवले, आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर, वेदश्री विशाल बकाल व ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करत यश संपादन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या यशस्वी मार्गदर्शनासाठी प्रयत्नशील राहिलेल्या शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी केले असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ही यशोगाथा शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे