🌙 आर्यभट्ट खगोल क्लबचा विशेष चंद्र निरीक्षण उपक्रम
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आर्यभट्ट खगोल क्लबच्या वतीने 24 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 7:30 वाजता खगोल निरीक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
🔭 कुतूहल संस्थेचे संचालक नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची मूलभूत माहिती दिली व त्यानंतर विद्यार्थ्यांनी दुर्बिणीच्या साहाय्याने चतुर्थीचा चंद्र प्रत्यक्ष पाहण्याचा रोमांचक अनुभव घेतला.
✨ या उपक्रमात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आकाश निरीक्षणाची अनोखी संधी लुटली.
आर्यभट्ट खगोल क्लब वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध खगोलनिरीक्षण उपक्रम, व्याख्याने व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असून पुढील महिन्यात विशेष खगोल कार्यशाळा होणार आहे.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद उपस्थित होते. शेवटी सौ. पूर्वा सोमण यांनी आभार प्रदर्शन केले.
