स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा ✅

बाल शिवाजी माध्यमिक शाळा, अकोला आणि कै. काकासाहेब ठोंबरे स्मृती सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकर सभागृहात वादविवाद स्पर्धा पार पडली.
विषय होता — “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर भारत खऱ्या अर्थाने डिजिटल झाला आहे !”

या स्पर्धेत अकोल्यातील 9 शाळांचे चमू सहभागी झाले.
🏆 विजेतेपद : बाल शिवाजी माध्यमिक शाळा (आनंदी योगेश सरप, सुप्रिया नवीनकुमार देशमुख)
🥈 द्वितीय क्रमांक : प्रभात किड्स, अकोला (अन्वी जायभाये, सोयरा अंधारे)
🌟 उत्कृष्ट वक्ता : आनंदी योगेश सरप – बाल शिवाजी माध्यमिक शाळा
🎖️ उत्तेजनार्थ : आरुषी इंगळे व गौरी पाटील – आर.डी.जी. पब्लिक स्कूल

सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजक संस्था, मान्यवर परीक्षक, शिक्षकवर्ग व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 👏✨