स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धांचे माझी बाळ शाळेत आयोजन
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेने स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धा आयोजन केले होते. यंदा या स्पर्धचे हे २१ वे वर्ष होते. या स्पर्धा ३ गटांमध्ये घेण्यात येतात. यात ‘अ’ व ‘ब’ गटात स्मरणशक्ती, चित्रकला व संस्कृत पाठांतर यांचा समावेश असतो तर ‘क’ गटात संस्कृत श्लोक पाठांतर व इंग्रजी कविता पाठांतर, बुद्धिबळ, निबंध, सामान्य ज्ञान या स्पर्धांचा समावेश होता. यावर्षी २६ शाळांचे एकूण ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे –
‘अ’ गट – स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम – युगंधर देशमुख (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक आशुतोष शिरभाते (कोठारी कॉन्व्हेंट ),तर उत्तेजनार्थ अंश महाकाळ (ज्ञानदर्पण शाळा),सोहम डहाके (विवेकानंद संस्कार केंद्र) व रुपेश कोगदे (जी. डी.प्लॅटिनम स्कूल ) हे विद्यार्थी होते. चित्रकला स्पर्धा- प्रथम समृद्धी भगत (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक श्रेया सुर्वे (ज्ञानदर्पण इ. स्कूल ),तर उत्तेजनार्थ विधी पोहरे (खंडेलवाल मराठी प्रा. शाळा), सानवी भाकरे (कोठारी कॉन्व्हेंट ) व वनश्री थोरात (खंडेलवाल ज्ञान मंदिर ) हे होते . पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक शौर्य नलावडे (विवेकानंद संस्कार केंद्र),व्दितीय क्रमांक वरदा कुळकर्णी (माझी बाल शाळा) तर उत्तेजनार्थ गोकुळ एरवंडे (बालज्योती कॉन्व्हेंट ),ओम इंगळे (विवेकानंद संस्कार केंद्र ),व तिथी टावरी (कोठारी कॉन्व्हेंट ) हे होते .’ब’ गट पाठांतर स्पर्धा – प्रथम क्रमांक अमोल चाळीसगावकर ( पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ), व्दितीय क्रमांक जाई पाटील (फुलपाखरू शाळा ),तर उत्तेजनार्थ आराध्य देशपांडे (कोठारी कॉन्व्हेंट ),रावी राऊत (बाल शिवाजी प्रा.शा.) व योगिता अहिर ( म्हळासा नारायणी प. स्कूल) हे विद्यार्थी होते.,
स्मरणशक्ती स्पर्धा- प्रथम क्रमांक – धनश्री हलवणे ( SOS),व्दितीय क्रमांक आस्था धाये (बाल शिवाजी प्रा. शाळा ),तर उत्तेजनार्थ नारायणी कडुस्कर (बाल शिवाजी प्रा.शाळा ), दिया इंगळे (जी. डी. प्लॅटिनम), व साक्षी उपर्वट (म्हळासा नारायणी प. स्कूल ).चित्रकला स्पर्धा- प्रथम क्रमांक यश डांगे (खंडेलवाल म. शाळा ),व्दितीय क्रमांक नंदिनी ठोंबरे ( म्हळासा नारायणी प. स्कूल),तर उत्तेजनार्थ अंकिता कराळे (ज्ञानदीप कॉन्व्हेंट),कार्तिकी सातपुते (खंडेलवाल ज्ञान मंदिर ) व अदिती टेम्भे (खंडेलवाल इं.प्रा.स्कूल ). या सर्व विजयी स्पर्धकांना सौ .अनुराधा मालशे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व सौ.शोभा अग्रवाल टीचर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
‘क’ गट बुद्धिबळ स्पर्धा विजेता विनीत चांडक ( पोतद्दार स्कूल ), उपविजेता सिया केडिया ( पोतद्दार स्कूल), उत्तेजनार्थ रेवा मुळे व देवांत वाकचवरे ( बाल शिवाजी प्रा. शाळा ) हे विद्यार्थी होते. पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक आत्मजा राऊत (बाल शिवाजी प्रा.शाळा),व्दितीय क्रमांक श्रावणी देशपांडे (पोतद्दार स्कूल ),तर उत्तेजनार्थ वेदश्री जोशी (बाल शिवाजी प्रा. शाळा), अदिती रत्नाळीकर (SOS ), धनश्री निंबोकार (ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट ). इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेत प्रथम क्रमांक जानवी बालानी (कोठारी कॉन्व्हेंट) व्दितीय क्रमांक सार्थक तिवारी (SOS ) तर उत्तेजनार्थ सुखदा चिकाटे (जी. डी. प्लॅटिनम) आनंदी सरप (बाल शिवाजी प्रा. शाळा) व तेजस्विनी शिंदे (ज्ञानदर्पण इ. शाळा) सामान्य ज्ञान स्पर्धा प्रथम समृद्धी काळंके (बाल शिवाजी प्रा.शाळा), व्दितीय क्रमांक अंजली कराळे (बाल शिवाजी प्रा. शाळा ),तर उत्तेजनार्थ रेवा अडगावकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), सार्थक उमरकर (जी. डी. प्लॅटिनम ), व वैभव तेलरांधे (खंडेलवाल इ. स्कूल ),निबंध स्पर्धा (इंग्रजी) प्रथम क्रमांक प्राजक्ता मिश्रा (उत्तमचंद राजेश्वर स्कूल),
व्दितीय क्रमांक अबीर गंगाखेडकर (बाल शिवाजी प्रा. शाळा),उत्तेजनार्थ आयुष जळमकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), स्वरांगी देशमुख, संस्कृती महल्ले (उत्तमचंद राजेश्वर स्कूल ), निबंध स्पर्धा (मराठी) प्रथम क्रमांक सौख्यदा कोकाटे (वंदे मातरम नूतन मराठी शाळा ),व उत्तेजनार्थ स्वरा पाठक (ज्युबिली इ. स्कूल ), इंग्रजी पाठांतर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दादा वंजारे सर व ज्योती इंगळे मॅडम लाभल्या. तर संस्कृत पाठांतरासाठी माया देशमुख व अनुराधा कोंडोलीकर (मालशे) ह्या होत्या. बुद्धिबळ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. जितेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे शाळेचे सचिव श्री.मोहन गद्रे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सौ. शोभा अग्रवाल तसेच सौ. भारती कुळकर्णी माझी बाळ शाळेच्या प्रमुख भावना उपासने यांनी कौतुक केले.