सोलापूरच्या ज्ञानप्रबोधिनीची बाल शिवाजी शाळेला सदिच्छा भेट

स्थानिक बालशिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला. येथे सोलापूर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतर्फे इ. १० वी च्या २२ विद्यार्थिनींनी २ शिक्षिकांसह दि. ४/८/२०१७ रोजी दु. ३ : ३० वा. सदिच्छा भेट दिली.

सर्वप्रथम बालशिवाजी शाळेच्या सहशिक्षिका सौ. मंजिरी कुलकर्णी यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षिका सौ. रत्नमाला जोशी व सौ. प्रविना काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थिनींचे स्वागत इ. १० वी च्या मुलींनी केले.

सौ. मंजिरी कुलकर्णी हयांनी शाळेची स्थापना, विशेष कार्य, उपक्रम, स्पर्धा परीक्षा, व्यवस्थ्यापन, शैक्षणिक कामकाजासोबत सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, सहल , स्नेहसंमेलन, क्षेत्रभेट, प्रकल्प इ. बाबत परिपूर्ण माहिती दिली.

व्यवस्थापक वर्ग, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी सहकार्यातून शाळेची होणारी उत्तरोतर प्रगती, इ. १० वी ची गुणवत्तेची परंपरा, १०० टक्के निकाल, ज्ञानरचनावादी शिक्षणाची माहिती दिली.

शाळेची लायब्ररी, संगीत कक्ष, संगणक कक्ष, डिजिटल कक्ष, इतर विविध कक्ष, प्रयोगशाळा इ. दाखवून कामकाजाबाबत चर्चा केली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब देव शाळा समिती सदस्या सौ. अनघाताई देव, मिहीर पुस्तकालयाचे श्री. बापट, मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ. कीर्ती चोपडे हयांची उपस्थिती होती.

नंतर इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून खुली चर्चा घडवून आणली. विचारांच्या आदानप्रदानातून दोन्ही शाळासंदर्भातील पूरक शैक्षणिक माहिती जाणून घेतली. ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षिका सौ. जोशी व सौ. काळे यांनी वैशिष्ठयपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
ज्ञानप्रबोधिनीच्या चमूला बालशिवाजी शाळेतर्फे या प्रसंगाची आठवण म्हणून पुस्तके भेट देण्यात आली.

आभारप्रदर्शन सौ. मंजिरी कुलकर्णी हयांनी केले. अल्पोपहारानंतर भावपूर्व निरोप देण्यात आला.