वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त रोप वाटप

१ जुलै ते ७ जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत
गृहराज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री मा.डॉ.रणजीतजी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून ‘वाढत्या प्रदूषणाला आळा घालायचा असेल तर जास्तीतजास्त वृक्ष लावायला हवेत; त्यांचे संगोपन व संवर्धन करायलाच हवे ‘ असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना विविध प्रकारची रोपं देऊन व त्याचे संवर्धन करण्यास सांगून आपल्या आणि पुढच्या पिढीची सोय आजपासूनच करा असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यर्थ्यांना दिला.

या प्रसंगी डॉ. सौ.अपर्णा पाटील,सौ.अंजली जोशी,मा.हरीश अमिनचंदानी,मा.प्रकाश चतरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगीता जळमकर,सौ. किर्ती चोपडे, सौ. भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.