विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) परीक्षेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड……

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथील अर्णव भांबेरे, तन्मय ताडे व निलय निखाडे या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यस्तरासाठी निवड मिळवली आहे. विज्ञान भारती (VIBHA), NCERT आणि NCSM यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारी ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विज्ञानाची आवड वाढवण्यास प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या अनघा देव, मुख्याध्यापिका संगीता जळमकर, कीर्ती चोपडे व सर्व शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन केले.