विद्यार्थी जीवनात ध्येय निश्चित असावे – मा. अक्षय राऊत
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी, राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा तसेचमहाराजांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे वाचन करावे’ असे मार्गदर्शन मा. अक्षय राऊत यांनी याप्रसंगी केले.
स्थानिक जठारपेठ अकोला येथे बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव व प्रमुख पाहुणे मा. अक्षय भाऊराव राऊत हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘ शिवाजी महाराजांचे बालपण ‘ या विषयी अथर्व तराळे यांने माहिती सांगितली. ‘ The Coronation Ceremony ‘ या विषयी अर्णव भांबेरे याने इंग्रजीतून माहिती सादर केली. तसेच शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आराध्या धनी व अवनी जोशी या विद्यर्थिनींनी सांगितली. त्यानंतर वर्ग ६ च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांनी ‘रणशिंग फुंकले … ‘ हे गीत सादर केले.
शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी प्रमुख अतिथी मा. अक्षय राऊतयांना शाळेची आठवण म्हणून भेटवस्तू प्रदान केली. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, ब्राह्मण सभा सदस्य मा. श्री. राजेंद्र मेंडकी, शिक्षक वृंद, पालक वर्ग व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्ग ६ ची स्वर्णाभ लांडगे याने केले. पाहुण्याचा परिचय शाळेच्या शिक्षिका शुभांगी तिडके यांनी केला तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका प्रीती निबांळकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.