विज्ञानाच्या निकषांवर जाहिरातींची सत्यासत्यता  पडताळून पहा :  श्री. सुहास उदपूरकर 

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन  विज्ञानप्रेमी मा. श्री. सुहास उदपूरकर यांच्या उपस्थितीत  अतिशय उत्साहात साजरा झाला.  या प्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या निकषांवर जाहिरातींची सत्यासत्यता  पडताळून  पाहण्याचे  आवाहन केले.

जाहिरातीतील मिथक ओळखावे त्यांना फसू नये.  पाणी हे सुद्धा एक केमिकल आहे असे सांगितले. या प्रसंगी ख़ुशी नितीन मोहोड ने विज्ञानाचे नवे शोध यामध्ये सहज अपघटन होऊ शकण्याऱ्या व खाण्यायोग्य पिशाव्यांची माहिती दिली. तर वेदांत अनिल मोंढे याने स्मार्ट फोन साठी २०-२५ मिनिटांत संपूर्ण चार्जिंग करण्याऱ्या ग्राफिन बॅटरी विषयी माहिती सांगितली.

१० फेब्रुवारीला आयोजित  Oops !…. I was knowing  it  या आंतरशालेय स्पर्धेचे  बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. ही स्पर्धा  बाल शिवाजीच्या वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या सक्रिय सहभागाने आयोजित केली होती. कोठारी कॉन्व्हेंट चे प्रथम शर्मा व आदित्य टावरी यांनी प्रथम व रसिका मल व वेदांत गाडोदिया यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच बाल शिवाजी माध्यमिक शाळेतर्फे १६ फेब्रुवारीस आंतरशालेय  विज्ञान मेळावा आयोजित केला.

या मेळयाव्यात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान खेळणी तयार केली. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यांत आले. प्रभात किड्सच्या निनाद शेगोकार व मिहीर टाले यांचा प्रथम व श्लोक भारंबे व अथर्व अरबट यांचा व्दितीय क्रमांक आला. बाल शिवाजीची साविका इंगळे व श्रेयस पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

संस्थाध्यक्ष श्री अविनाश देव यांनी कार्यक्रमाचे अतिथी श्री. उदापूरकर सर यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तसेच बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तलिखित’ देवाशिष ‘ चे  श्री. उदापूरकर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या प्रसंगी सचिव श्री. मोहन गद्रे सर यांनी अतिथींना भेटवस्तू प्रदान केली.

या कार्यक्रमाला कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, कुतूहल संस्कार केंद्राचे संस्थापक  डॉ. श्री. नितीन ओक तसेच शाळा समिती सद्यस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल ,सौ. किर्ती चोपडे, सौ. संगीता जळमकर तसेच शिक्षक वृंद विद्यार्थीं व पालकांची  उपस्थिती  लाभली.  तसेच कार्यक्रमाचे संचालन  व आभारप्रदर्शन सौ. अर्चना पावडे यांनी केले. सौ. रश्मी जोशी यांच्या एकात्मता मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.