राष्ट्रीय गणित दिवस बाल शिवाजी शाळेत साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत २२ व २३ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.  थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आपण २२ डिसेंबर हा दिवस ‘ राष्ट्रीय गणित दिवस ‘ म्हणून साजरा करतो.   मानवतेच्या विकासासाठी, गणिताचे महत्त्व समजणे व गणितविषयी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होण्यासाठी  शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. वर्ग १ ते २ च्या विद्यार्थ्यांनी विविध  गणितीय  खेळ सादर केले.

तसेच वर्ग ३ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी  गणितावर आधारित चार्ट सादरीकरण, गणितीय रांगोळी, Maths Models व Maths Quiz हे प्रकार गटनिहाय सादर केले.  या प्रदर्शनामध्ये Pythagoras theorem, Metric measures, Formulaes of Area & circumference, Tricks of Multiplication and Division, Square Cubes, Three Dimension अशा  विविध गणितीय प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनीचे उदघाटन संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे सर यांनी केले.  याप्रसंगी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. किर्ती चोपडे, शिक्षिका व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षिकांनी प्रदर्शनीला भेट दिली.