राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत इयत्ता ७ वी चा आदित्य आवळे द्वितीय
हार्दिक हार्दिक अभिनंदन आदित्य
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, सामाजिक वनीकरण विभाग अकोला व निसर्ग कट्टा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मी केंद्रिय पर्यावरण मंत्री झालो तर’.. या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत इयत्ता ७ वी तील आदित्य योगेश आवळे यास द्वितीय पारितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप रु. 1000/- रोख रक्कम व स्मृतीचिन्ह असे आहे. या यशाबद्दल आदित्य आणि त्याच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
