माझी बाल शाळेच्या वतीने स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रीत्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन
जठारपेठ येथील ब्राह्मण सभागृहात माझी बाल शाळेच्या वतीने स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रीत्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यंदा या उपक्रमाचे २८ वे वर्ष पूर्ण झाले असून, २४ शाळांमधील तब्बल ४६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धा अ, ब व क अशा तीन गटात घेण्यात आल्या. यामध्ये स्मरणशक्ती, चित्रकला, संस्कृत व मराठी कविता, इंग्रजी कविता, निबंध, बुद्धिबळ, सामान्यज्ञान, वेशभूषा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी परीक्षक म्हणून सौ. सोनल थत्ते, सौ. माया देशमुख, सौ. उत्तरा कुळकर्णी, श्री. जितेंद्र अग्रवाल, सौ. आकांक्षा देशमुख, सौ. प्रिती गावपांडे, सौ. सीमा देशपांडे, सौ. मेघा क्षिरसागर, सौ. मृण्मयी बोबडे व सौ. अर्चना मुळे यांनी आपले मार्गदर्शन लाभविले.
🏆 विविध गटातील विद्यार्थ्यांनी आपापली कला व ज्ञान प्रदर्शित करून मानाचे क्रमांक पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना मुख्याध्यापिका व परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
👉 या कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, सौ. अनघा देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी व सौ. भारती कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
