भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025–26 मध्ये विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश…..

भूगोल विषयातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेणाऱ्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025–26 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत बाल शिवाजी शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत खालील विद्यार्थ्यांनी पदक मिळवले आहे—

वर्ग 5 : पार्थ विक्रम घाइट — सिल्वर मेडल, प्राप्त गुण 100 पैकी 92

वर्ग 6 : तन्मय सचिन ताडे — सिल्वर मेडल, प्राप्त गुण 100 पैकी 92

वर्ग 10 : अदिती प्रवीण उजाडे — सिल्वर मेडल, प्राप्त गुण 100 पैकी 92

वर्ग 10 : सोनाक्षी मधुकर दावेदार — गोल्ड मेडल, प्राप्त गुण 100 पैकी 96

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शाळेच्या शिक्षिकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. शाळा प्रशासनातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही विद्यार्थ्यांनी असेच उज्ज्वल यश संपादन करावे, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. 🌹