बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न 

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.  माध्यमिक  शालान्त परीक्षेत  शाळेतून प्रथम  येण्याचा बहुमान प्राप्त करणारा गौरी प्रशांत साबळे हिच्या  हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वा.सावरकर रचित ‘जयोस्तुते…’ हे समूहगीत सादर केले. क्रांतिकारकांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग नवल पाथरे याने सांगितला. तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील गाजलेल्या घोषणांविषयी माहिती रेवती घोगरे व वेदांत कुटे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ब्रिटिश सरकारला हादरून टाकणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्याविषयी  माहिती समृद्धी मगर हिने आपल्या इंग्रजी भाषणातून सांगितली.  यानंतर वर्ग ७ वीच्या काही विद्यार्थ्यांनी ‘उधळीत शतकिराणा….   ‘ हे समूहगीत सादर केले. यानंतर मार्च २०२३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग ५ वा) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (वर्ग ८ वा)  यामध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच MKCL तर्फे घेण्यात आलेल्या E -Test चे विजेत्यांना पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. या प्रसंगी गौरीने आपले मनोगत मांडले व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या स्वातंत्र्यदिनी  संस्थेचे  अध्यक्षश्री. अविनाश देव यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  केले. 

या  कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्षश्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे,संस्थेच्या सह सचिव सौ. वैशाली देशपांडे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, श्री. नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य श्री. महेश कोतेगावकर, सौ. रेणुका भाले,  प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग तसेच शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. स्वप्निल सांगळे व डॉ. शिवाजी सोनोने  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल भाकरे हिने  केले. तर प्रास्ताविक सौ. मीना मुरुमकार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली.