बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समिती अंतर्गत किशोरवयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन….
दि.04/10/2024 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता शाळेतील सभागृहात सखी सावित्री समितीची तिसरी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सर्व सभासद उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेमध्ये शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहे. मोबाईल इंटरनेट वेगवेगळ्या ॲप्स द्वारा नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. ज्या वयात योग्य संस्कार रुजवायला हवे, त्या वयात विद्यार्थी/मुले नको त्या प्रलोभनाला बळी पडतात आणि कधी-कधी गैरमार्गाकडे आत्कृष्ट होतात. परीक्षा, खाजगी वर्ग,खेळण्यावर मर्यादा मित्र-मैत्रिणीत होणारी तुलना पालकांचे होणारे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्याचे निवारण होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजेच समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते अशा परिस्थितीत विद्यार्थी मुले मुली निराश होऊ नये त्यांना नैराश्य येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना समुपदेशन करावे असे माननीय डॉ. सौ. राधिका केळकर म्हणाल्या. शालेय शिक्षणाबरोबरच वाचन कौशल्य, भाषण कौशल्य, संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन सत्र आयोजित करणे याबाबत सौ वैशाली देशपांडे यांनी चर्चा केली. सखी सावित्री या उपक्रमांतर्गत डॉक्टर सीमा तायडे यांचे मुलांना मार्गदर्शन किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या वयानुसार बदल होत असतात. त्याचबरोबर त्यांना समतोल आहाराची आवश्यकता असते. समतोल आहाराचे त्यांनी महत्त्व मुलांना पटवून सांगितले. मुलांना व्यायामाचे महत्त्व पटवून देताना दररोज एक तास तरी मुलांनी चालावे किंवा खेळायला जावे .दोन्ही शक्य नसल्यास घरी योगासने करावी. स्वच्छतेचे महत्व सुद्धा विशद केले. मुलांना ‘good touch bad touch’ या संदर्भात एक व्हिडिओ दाखवला आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा आपल्याशी होणारा संपर्क कसा आहे हे कसे ओळखावे याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले .मुलींना या वयामध्ये मासिक पाळी बद्दल काही त्रास उद्भवतो तर त्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ‘she cup’ याबद्दल पूर्ण माहिती सांगितली. त्याचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. वर्गातील जे विद्यार्थी मागे पडतात त्यांना इतर प्रगत विद्यार्थ्यांनी सोबत द्यावे त्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी शिक्षकांच्या मदतीने सोडवण्यात वर्गात शिस्त राहावी, यासाठी विद्यार्थ्यांची संवाद साधावा इतर गोष्टींवर सौ. जळमकर टिचरांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करणे आणि नवनवीन शब्दसाठा करणे याबाबतीत सौ. चोपडे टीचर आणि मार्गदर्शन केले. सखी सावित्री समितीचा व्हाट्सअप ग्रुप असावा असे सर्वांमध्ये ठरले आणि कालच तो ग्रुप तयार केला गेला. अशाप्रकारे या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली विद्यार्थी सुरक्षितता व मार्गदर्शन याबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली.