बाल शिवाजी शाळेत शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा….
21/09/2024 शनिवार रोजी बाल शिवाजी प्राथमिक शाळेत अण्णासाहेब देव सभागृह येथे दुपारी 12.50 ते 3.10 मि. या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांची प्रो. डॉ. मेघराज गाडगे सरांनी कार्यशाळा घेतली. प्रो. डॉ. घाडगे सरांनी शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शनास सुरुवात केली PPT च्या आधारे त्यांनी The art of technique (Pedagogy) अध्यापनशास्त्र याबाबत आदर्श शिक्षक कसा असावा? त्यांच्या अध्यापनात कोणते घटक असावे? आपले अध्यापन प्रभावी कसे करावे? शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे नाते कसे असावे? वर्गातील वातावरण, विविध अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांसोबत मौखिक, शारीरिक हालचाली व यांचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांचा शिक्षक व त्यांच्या अध्यापनाबाबत अभिप्राय इत्यादी विषयांवर वेगवेगळी उदाहरणे देऊन व्हिडिओ दाखवून अतिशय मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. आपल्या अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा आपल्या अध्यापनाचे सिंहावलोकन करावे, असेही सांगितले. प्रत्येक शिक्षकाने आपले अध्यापन प्रभावी करण्यासाठी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे. भरपूर वाचन करावे. एक शिक्षक म्हणून समाजात आपले वागणे, बोलणे, राहणीमान व्यवसायाला अनुसरून ठेवावे असेही सांगितले. शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी Roll model असतात. एक संपूर्ण पिढी घडवण्याची ताकद एका शिक्षकात असते. त्यामुळे शिक्षकाला आपल्या जबाबदारीचे भान असावे, काळानुसार शिक्षकाने स्वतःमध्ये आणि अध्यापन पद्धतीत बदल करावेत. त्यासाठी विविध कार्यशाळा सेमिनार शिक्षक तज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे आपल्या सहकार्याची सलोख्याचे संबंध ठेवावेत. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांप्रती आदर युक्त भीती असावी एक चांगला शिक्षक होण्यासाठी त्याने प्रथम एक चांगला विद्यार्थी होणे आवश्यक आहे. जो विद्यार्थ्यांच्या मनात जागा निर्माण करू शकतो तोच एक यशस्वी शिक्षक होय. जर शिक्षकाला विद्यार्थ्यांचे प्रेम मिळाले तरच त्यांना त्यांच्या व्यवसायात समाधान लाभते. अशाप्रकारे शिक्षिकांना मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले.