बाल शिवाजी शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतीदिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. १ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या वर्गवार वक्तृत्व स्पर्धेची प्रथम  वर्ग ५ चे ईश्वरी किशोर तायडे, आदिती अजय देशमुख, समृद्धी मनिष मगर, वर्ग ६ चे  अभिनव निलेश सोनी, वरद राजेश कवडे,  आनंदी सुनील म्हैसने  व वर्ग ७ चे   रेवा नितीन मुळे, आत्मजा संजय राऊत,अंजली अजय कराळे  या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ‘ कोरोना काळात मोबाईल नसते तर ……’  या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मत  उत्कृष्टपणे मांडले. त्यातून ३ विजयी स्पर्धकांनी ‘   कोरोना काळातील गमती जमती ‘ या विषयावर उस्त्फुर्तपणे आपले विचार मांडले. त्यातून उत्कृष्ट वक्ता म्हणून रेवा नितीन  मुळे  वर्ग ७ हिची  निवड करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून राज्यस्तरीय व राष्ट्रीय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे विजेते, आर. डी. जी. महिला महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक श्री. सुमित जोशी व बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या शिक्षिका सौ. स्वाती बापट हे लाभले होते.या प्रसंगी प्रा.जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना  वक्तृत्वासाठी असलेले गुणवैशिष्ट्ये व कौशल्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा, संस्थेच्या सहसचिव  सौ.  वैशाली देशपांडे   यांनी याप्रसंगी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऱ्या शिक्षिकांच्या नियोजनाचे कौतुक केले.  सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे  प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे,  बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे ,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर ,सर्व शिक्षिका, पालक वर्ग उपस्थित होता. तसेच वर्ग ५ ते ७ चे विद्यार्थी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन शुभांगी तिडके  यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.