बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. गणिताचे महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. वर्ग १ ली ते २ री च्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय खेळ व वर्ग ३ री च्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय खेळणी, वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय प्रश्नमंजूषा, वर्ग ५ व ६ साठी गणितीय खेळणी व चित्रकला स्पर्धा, वर्ग ७ ते ८ साठी गणितीय तक्ता सादरीकरण व गणितीय रांगोळी सादर केल्या. तसेच वर्ग ९ व १० साठी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गणितीय प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली. वर्गावर्गात शिक्षिकांनी थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. 22 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अंजली शेटे व गणित दिनाचे महत्व प्रिती निंबाळकर यांनी सांगितले. त्यानंतर याप्रसंगी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मुख्याध्यापिकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकासौ.कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रदर्शनीला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.