बाल शिवाजी शाळेत ‘राष्ट्रीय युवादिन’ व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न
युवकांना आदर्श विचारांनी प्रेरित करणाऱ्या स्वामी विवेकानंद तसेच स्वराज्याचे बीज शिवबात रुजवून संपूर्ण महाराष्ट्राला स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवणाऱ्या जिजाऊंची जयंती बाल शिवाजी शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान इयत्ता ९ वी च्या आदित्य प्रकाश चतरकर ह्याने भूषविले. स्वामी विवेकानंद व जिजाऊंच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्जवलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विवेकानंदाचे जाती -धर्माबद्दलचे विचार श्रीहरी देशपांडे याने सांगितले. स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील भाषण हर्ष नाईकने सादर केले. तनुश्री खर्चे हिने स्वरचित कवितेतून स्वामी विवेकानंदांचे कार्य विशद केले. राष्ट्रमाता जिजाऊंचे कार्यकर्तृत्व जुई उंबरकारने आपल्या भाषणातून सांगितले. तसेच स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एकाग्रतेचे महत्त्व सांगणारे दोन प्रेरक प्रसंग कौशिक जोशी याने विद्यार्थ्याने सांगितले. धनश्री धोत्रे हिने स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता आपल्या भाषणातून प्रतिपादन केली. अध्यक्षीय भाषणात आदित्य चतरकर याने ‘भविष्यात युवापिढीचे नेतृत्व आपल्या हाती असणार आहे तेव्हा जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार अंगिकारून विचारांनी सशक्त बनल्यास आपल्या भारताचे नाव उज्ज्वल करू शकू ‘ असा दृढविश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैत्राली जोशी हिने केले. या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका
सौ. किर्ती चोपडे व भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली.