बाल शिवाजी शाळेत महिषासुरमर्दिनी स्तोत्र सामूहिक पठण….

दिनांक ०५/१०/२०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्र स्थान आहे. देवी भगवती दुर्गा ही साक्षात शक्ती रूपात सर्वत्र स्थित आहे. दुर्गेच्या या शक्ति रूपांचे सर्व स्त्री-पुरुषांमध्ये अधिष्ठान असतेच. केवळ या शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे, संयमतून नियंत्रण मिळवणे हेच खरे नवरात्री पूजन होय. दुर्गेचे रूप केवळ बघण्यासाठी नव्हे तर आत्मसात करण्यासाठी आहे. सिंह, विविध आयुध, अलंकार, वस्त्र आणि देवीच्या चेहऱ्यावरील शांत आणि प्रसन्न भाव यांचे अर्थ नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. नवरात्री पूजनाची पारंपारिक कथेतून आधुनिक काळाशी सांगड घालून या उत्सवाला वेगळा आयाम देण्यात आला. संकटातून मार्ग दाखवणाऱ्या दुर्गेच्या रुद्र रूपाचे, शौर्याचे वर्णन करणारे स्तोत्र म्हणजे महिषासुरमर्दिनी स्तोत्र ही भारतीय संस्कृती जपत नवरात्रोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण केले.

याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री मोहन गद्रे सर, त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळमकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका किरण मुरूमकार, रागिणी बक्षी व भारती कुलकर्णी तसेच सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.