बाल शिवाजी शाळेत महावाचन उत्सव -2024 उत्साहात साजरा…..
29 जुलै 2024 रोजी ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. श्याम राऊत सर व केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषविले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन याप्रसंगी केले. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनावर आधारित प्रश्न विचारले. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांनी वाचन का करावे व ते कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी श्री. श्याम राऊत सर यांनी महावाचन उत्सव या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमात घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांसाठी सहभागी होण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यानंतर 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जात असल्याने त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जळमकर टीचर,बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चोपडे टीचर, शाळेतील शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सौ.शितल थोडगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.