बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा संपन्न..

दिनांक 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा स्थापन करण्यात आली. परिवहन समिती साठी आवश्यक असलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस वाहन निरीक्षक श्री.मनोज शेळके, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा श्री. जयवंत शिंदे तसेच शिक्षण केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे, शाळा शिक्षक पालक संघ प्रतिनिधी श्री. विनोद इंगळे, श्री. दिनेश पांडव तसेच श्री. निलेश देव, वाहन चालक प्रतिनिधी आणि सर्व वाहन चालक असे सर्व सभासद उपस्थित होते. प्रथमतः केंद्रप्रमुख श्री.गोपाल सुरे यांनी वाहन चालकांना विद्यार्थ्यांची जबाबदारी सर्वात मोठी जबाबदारी आहे,त्या अनुषंगाने परिवहन समिती स्थापन झाल्याचे घोषित केले. परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक श्री. मनोज शेळके यांनी ‘Prevention is always better than cure’ असे वक्तव्य करून वाहन चालकांना मार्गदर्शन करताना वाहतुकीच्या काही मुख्य बाबींचे नियम लक्षात आणून दिले. ज्यामध्ये वाहन चालकांचा परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र तसेच इतर नियमांची सविस्तर माहिती दिली. उपनिरीक्षक वाहतूक शाखा जयवंत शिंदे यांनी देखील वाहन चालकांची जबाबदारी काय? हे स्पष्ट केले. वाहन चालकांनी आपली जबाबदारी जाणून गाफील न राहता कार्य करणे आवश्यक आहेत.अपघात होण्याची प्रमुख कारणे वाढता वेग, मोबाईलचा वापर, वाहतूक नियम न पाळणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविने, हे आहेत. अपघात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायाची योजना करणे आवश्यक आहे. कोणाच्या जीवासोबत झालेली हानी कधीच भरून निघू शकत नाही.त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे व त्यासाठी सुरक्षित यंत्रणा राबविण्याचे आवाहन जयवंत शिंदे सरांनी केले. अशाप्रकारे मोलाचे व सुरक्षितेचे नियम त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. या कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांचे बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.