बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव,संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्राची सुरुवात ‘या रे या सारे या ……’ ह्या गणपती बाप्पाच्या गाण्याने झाली. फुलवाडी ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची नृत्य सादर केलीत. वर्ग १ लीच्या आदिनाथ सोमण याने नाट्यछटा उत्कृष्टपणे सादर केली. गिरीजा रानडे व अद्वैत गायकवाड या वर्ग ४ च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम केले. दुपारच्या सत्राची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. वर्ग ४ ते ९ च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बहारदार नृत्य सादर केलीत, तसेच सोशल मिडिया चा मर्यादित वापर या विषयावर आधारित ही इंग्रजी नाटिका ‘ सोशल मिडिया ‘ ही हिंदी नाटिका ‘ अतिथी देवो भव ‘ तर ‘ हॅपी बर्थडे ‘ ही मराठी नाटिका सादर केली. वर्ग ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘रामकथा’ हे नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमामध्ये २०२२-२३ या सत्रातील इयत्ता १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. गौरी साबळे, मधुरा उपश्याम, भक्ती मेन, ऋतुराज कातखेडे, कृष्णा बोर्डे या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक मा. डॉ. सुचेता पाटेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेतील सत्र २०२३-२४ मधील आदर्श विद्यार्थी म्हणून संस्कृती पाठक हिला मा. डॉ. सुचेता पाटेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. तसेच मा. डॉ. सुचेता पाटेकर यांनी पालकांना उद्बोधन केले. निबंध स्पर्धेच्या परीक्षक सौ. स्वाती दामोदरे यांनी निबंध स्पर्धेबद्दल व स्पर्धेच्या विषयांच्या मूल्यमापनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. शाळेच्या पालक वाचनालयातर्फे पालकांसाठी तसेच पालक शिक्षिकांसाठी आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव व सहसचिव सौ.वैशाली देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. नर्सरी ते वर्ग ५ वी च्या पालकांसाठी आयोजित ‘शिस्तबद्ध विद्यार्थी शिस्तीचे महत्व ‘ या विषयावरील निबंध स्पर्धेत श्री. शिवाजी नागरे यांना प्रथम क्रमांक व श्री. किशोर नेमाडे यांना व्दितीय क्रमांक, सौ. विद्या घाईट, सौ.दिपाली पारडे, बळीराम अवचार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच पालक शिक्षिका मधून सौ. रागिणी बक्षी यांना प्रथम व सौ. अंजली शेटे यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. वर्ग ६ ते १० वी च्या पालकांसाठी ‘पालक सोशल मिडिया आणि आजचा विद्यार्थी ‘ या विषयावरील निबंधासाठी सौ. रेणुका भाले यांना प्रथम ,सौ. दर्शना इंगळे यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. सौ. जयश्री साखरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच पालक शिक्षिका सौ. अपेक्षा आवळे यांना प्रथम, सौ. किर्ती खपली यांना व्दितीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सूत्रसंचालन सहशिक्षिका शीतल थोडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग १० च्या अवनी देशपांडे, श्रीहरी राऊत, योगिनी निकम, अथर्व काळपांडे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघा देव, सौ. वैशाली देशपांडे, श्री. नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य व इतर मान्यवर, सर्व शिक्षिका, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.