बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यश…
जळगाव (खान्देश) – महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेशी संलग्नित अकोला महानगर डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ व ३ जुलै २०२५ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये अकोल्यातील ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी कु. अभिज्ञा राहुल इंगळे हिने चमकदार कामगिरी करत कास्यपदक पटकावले.
तर इयत्ता 9 वीतील कु. वेदश्री योगेश गोतमारे हिने ७० किलो वजन गटामध्ये सामना जिंकून प्रथम क्रमांक प्राप्त केला. मिळवला असून त्यामध्ये तिला सुवर्णपदक मिळाले आहे.
विशेष म्हणजे या दोघींची निवड आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीयस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा ताई देव, शाळा समिती सदस्य यांनी व बालशिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद, यांनी भरभरून कौतुक केले.
