बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांची बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन शालेय क्रीडा स्पर्धा  २३/०८/२०२३ रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांनी  सहभाग नोंदविला होता.  यामध्ये स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळा व बाल शिवाजी माध्यमिक शाळेने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निवड चाचणी घेण्यात आली त्यामध्ये वर्ग ८ वी ची वैदेही प्रफुल्ल भारसाकळ हिने प्रथम क्रमांक मिळवून आपले स्थान विभागीय स्पर्धेत निश्चित केले व वर्ग ७ वी चा विद्यार्थी भावेश अंकुश पटेल यांनी मुलांमधनं 14 वर्षाखालील मध्ये द्वितीय स्थान मिळवून विभागीय स्तरावर यश प्राप्त केले. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई  देव,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ.संगिता जळमकर, सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.