बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. शोभा अग्रवाल कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित . ……

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग)अकोला तर्फे शिक्षकदिना निमित्त जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या ;आपल्या कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना पुरस्कृत करण्यात आले.८ सप्टेंबर रोजी ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. शोभा दिपक अग्रवाल यांना उत्कृष्ट मराठी शाळेचे उत्तम व्यवस्थापन व प्रशासन यासाठीचा ‘कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार’ पालकमंत्री मा.ना.डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला उदघाटक म्हणून पालकमंत्री डॉ.रणजित पाटील उपस्थित होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.चापके होते.या प्रसंगी माजी आमदार वसंतराव खोटरे,उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, डॉ.आर.बी.हेडा, vWM- मोतीसिह मेहता,डॉ.अपर्णाताई पाटील,डॉ. बजाज,डॉ.अविनाश बोर्डे,डॉ.गजानन नारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश चतरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य,शाळा समिती सदस्य , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे,सौ.संगिता जळमकर,सौ.भारती कुळकर्णी,सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.