बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
९२ पैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. तर त्यापैकी ४० विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. तसेच १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कला व क्रीडा सवलत गुण वगळून गौरी प्रशांत साबळे हिने सर्वाधिक ९७.८० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच भक्ती मनीष मेन ही ९७.००% गुण मिळवून शाळेत व्दितीय तर ऋतुराज सुरेश कातखेडे ९६.८० % गुण मिळवून शाळेतून तृतीय आला तर मधुरा अभय उपश्याम ९६.६०% चौथी तर कृष्णा अविनाश बोर्डे ९६.२०% गुण प्राप्त करून आपले पाचव्या क्रमांकाचे स्थान निश्चित केले आहे.
संस्कृत विषयात ११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, गणित विषयात ४ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. संस्थेच्या उपसचिव सौ. वैशाली देशपांडे, कार्यकारिणी सदस्य श्री. नरेंद्र देशपांडे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.