बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या क्रिकेट चमुचे विभागीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन

अकोला जिल्हा महानगर अंतर्गत कोविड-19 नंतर जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली असून त्या स्पर्धेमध्ये स्थानिक बाल शिवाजी माध्यमिक शाळा जठारपेठ येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन असून या चमूची निवड विभागीय स्तराकरिता निवड करण्यात आली आहे.  बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनासह सांस्कृतिक कथा क्रीडा गुणांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जाते. Covid-19 च्या प्रादुर्भावात केवळ ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे कुठल्याही शालेय स्पर्धा होऊ शकल्या नाही.  मात्र चालू शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले.  विविध क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो.  क्रीडा व युवासेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा परिषद, विभागीय क्रीडा संकुल समिती, विभागीय क्रीडा कार्यालय, अमरावती येथे टेनिस बॉल क्रिकेट  असोसिएशन तर्फे स्पर्धा  12.1.2023 रोजी संपन्न झाल्या असून त्यामध्ये अकोला मनपा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेने आपला सहभाग नोंदवला. 

अकोला व अमरावती  स्पर्धेत अकोला विजयी तर अकोला व बुलढाणा ग्रामीण यामध्येही अकोला विजयी झाले. अकोला  व यवतमाळ ग्रामीण यामध्येही अकोला विजयी  होऊन व फायनल मॅच मध्येअकोला मनपा अकोला ग्रामीण मध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेने उत्कृष्ट प्रदर्शन करून व्दितीय क्रमांकाचे स्थान  प्राप्त केले आहे. या टिम मध्ये अथर्व रवींद्र  भांबेरे (कॅप्टन), अद्वित अनिल पारसकर, कृष्णा अविनाश बोर्डे, विवेक रविंद्र अघडते, साहिल जयंत कुळकर्णी, पार्थ रविंद्र धोत्रे, देवांग अनिल मोंढे, सोहम दुर्वास भिवटे, प्रथमेश प्रमोद बुटे, कृष्णा प्रदीप पोहरे, दर्शन गजानन बोदडे, संदेश ज्ञानेश्वर खडसे, नचिकेत संदीप सहस्त्रबुद्धे आणि आदित्य बंड हे विद्यार्थी सहभागी होते. 

त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्या करता संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव  श्री मोहन गद्रे, शाळा समिती सदस्य सौ. अनघाताई देव यांनी व तसेच माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे तसेच शिक्षिका व  कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले आहे.