बाल शिवाजी माध्यमिक शाळेची आर्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम 

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथे स्व.सरलाबाई गहिलोत यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत “Should Social Media be banned or not under 18 ”  या विषयाच्या बाजूने आपले मत ठामपणे मांडत कु. आर्या दत्तात्रय कराळे वर्ग ९ च्या विद्यार्थिनीने  सर्वोकृष्ट वक्तृत्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  पटकाविले. प्रमाणपत्र,रोख पारितोषिक,स्मृतिचिन्ह देऊन तिला गौरविण्यात आले. तसेच शाळेला फिरती ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. 

आर्याने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री.अविनाश  देव, सचिव श्री. मोहन गद्रे ,शाळा समिती सदस्य  सौ. अनघाताई  देव , तसेच सर्व शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे तसेच सर्व शिक्षिका, सर्व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.