बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न
जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री च्या विद्यार्थिनी अन्वया निलेश पाकदुने व ऋग्वेदा अरविंद उगले यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत गार्गी पराग देशमुख हिने पुष्प देऊन केले. सर्व प्रथम ‘श्री विष्णूंचे अवतार’ ही नाटिका सादर करण्यात आली.नाटिकेचे संचालन देवश्री दत्तात्रय कराळे आणि शाल्मली विवेक देशपांडे यांनी केले. श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी काही अवतार यावेळी प्रस्तुत करण्यात आले. यामध्ये श्री विष्णू मत्स्यावतार – अद्वैत प्रविण गायकवाड, कूर्मावतार – ओजस अमोल माडीवाले, नरसिंह अवतार – अभिराम जयआशिष जोशी, हिरण्यकश्यप – कुशल विवेक चापके, वामनरूप बटू अवतार – स्वर समीर थोडगे, परशुराम अवतार – आदिश मयूर देशमुख, श्रीराम अवतार – तन्मय सचिन ताडे, लक्ष्मण – आरव विनोद भालतिलक, सीता – आस्था संतोष गेबड, हनुमान – सोहम सुनिल कराळे, श्रीकृष्ण अवतार – अवनिश मुकेश निचळ, संवाद कर्ता – रुद्राक्ष अक्षय कुळकर्णी हे विद्यार्थी सहभागी होते. श्रीहरी स्तोत्रातून विद्यार्थ्यांनी श्री विष्णु स्तुती सादर केली. देवकीचे पुत्र वियोगाचे दुःख आपल्या स्वगतातून गिरीजा सुयोग रानडे हिने उत्तमरित्या सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी ‘कान्हा सो जा जरा… ‘ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. ‘पुस्तकांशी मैत्री करून मोबाईलला दूर ठेवा ‘ असा संदेश प्रमुख अतिथी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या सह. शिक्षिका सौ.कीर्ती खपली यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षिका सौ.अश्विनी पांडे, सौ. मीनाक्षी जोशी , सौ. साक्षी सहस्रबुद्धे, सौ. रागिणी बक्षी, नृत्य शिक्षिका नंदिनी बोडसे, संगीत शिक्षक श्री.पुरुषोत्तम कोरान्ने सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य सौ. रेणुका भाले,प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्णाच्या नामगजरात झाली.