बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा…
बाल शिवाजी शाळेत शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी दिनांक 22 जुलै 2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस हा उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी वर्गावर्गातून शैक्षणिक साहित्य तयार करून त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन दिवस राबवला. तसेच दिनांक 23 जुलै 2024 मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस अंतर्गत विविध गणितीय कोडी ,गणितीय प्रश्नमंजुषा, गणितीय खेळ वर्गांतून घेण्यात आले . दिनांक 24 जुलै 2024 रोजी क्रीडा दिवसाचे आयोजन करून क्रीडा शिक्षकांनी डंबेल्स घुंगरू काठी, क्रिकेट असे मैदानी खेळ, कॅरम व बुद्धिबळ या बैठे खेळाचे सुद्धा आयोजन केले. दिनांक 25 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक दिनांतर्गत वेगवेगळ्या राज्यांचे पेहराव तसेच त्या अनुषंगाने वेगवेगळे पदार्थ, महाराष्ट्रातील संत, असे सांस्कृतिक दिवसाचे सादरीकरण करण्यात आले. 26 जुलै 2024 रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रमांतर्गत शिवणकाम, पत्रावळी तयार करणे, वाती तयार करणे तसेच कडधान्यानअ मोड आणणे अशा गृहउद्योग वा लघुउद्योगांचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी वरील वस्तू तयार केल्या. विद्यार्थ्यांनी किराणा दुकान व भाजी बाजाराला भेट देऊन तेथे देखील व्यवहार धडे घेतले व पुढील दोन दिवसाचे नियोजन अशाच पद्धतीने तयार केले आहेत.अशा पद्धतीने उत्साहात हा शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे