बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी!!!

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक महामंडळातर्फे 2024 – 25 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित डॉ. होमी भाभा ‘बाल वैज्ञानिक व्हा’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता 9 वी चा आयुष गजानन जळमकर व इयत्ता 6 वी चा श्रीयश विनायक पाठक यांनी रौप्य पदक पटकावून बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे. आयुष, श्रीयश व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी केले.