निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक —-आहारतज्ञ सौ. मनीषा वराडे

स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षिकां करिता ‘स्त्रियांचे आरोग्य व आहार ‘ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत न्यूट्रिशनिस्ट व लाईफस्टाईल कन्सल्टंट सौ. मनीषा वराडे यांनी शाळेतील सर्व शिक्षिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या, रोजच्या कामाच्या दगदगीत आपल्याला साथ देणारे शरीर निरोगी राखायचे असेल तर प्रत्येकाने संतुलित आहार घेणे गरजेचेच आहे.पुरेशी झोप ही सर्वांना आवश्यक आहे,त्याचप्रमाणे नियमित पुरेसा व्यायाम करणे गरजेचे आहे.कार्य्रक्रमाच्या शेवटी शिक्षिकांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन त्यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ.कीर्ती चोपडे,सौ.संगीता जळमकर, सौ.भारती कुळकर्णी, सर्व स्त्री शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.