तानसेन संगीत विद्यालयाचे शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश

अकोला – ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथे कार्यरत असलेल्या तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे.

या परीक्षेमध्ये प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम आणि प्रवेशिका पूर्ण या स्तरांमध्ये गायन व तबलावादन विषयात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व विशेष योग्यता प्राप्त केली.

प्रारंभिक गायन परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी –
अदिश्री शरद इंगळे, स्वरा केशव मुरूमकार, आत्मजा प्रदीप चौखंडे, स्वरा नितीन भोजापुरे, आर्या गजानन शेंडकर, जीविका संतोष रामटेके, तनुश्री नागोराव गव्हाळे

प्रारंभिक तबलावादन परीक्षेत –
रुद्र प्रमोद मार्कंडे, भार्गव प्रदीप भारंबे, अभिषेक विजय पाचडे

प्रवेशिका प्रथम (गायन) –
काव्या जयंत पाठक, पयोष्णी प्रसन्न देशपांडे, त्रिष्णा प्रवीण कानकिरण, शांभवी किरण सुदामे, तन्मय सचिन ताडे, अर्णव रवींद्र भांबेरे

प्रवेशिका प्रथम (तबलावादन) –
सार्थक चारुदत्त पांडे

प्रवेशिका पूर्ण (गायन) –
स्वरा संदीप झोडपे, शरण्या संग्राम खानझोडे, कल्याणी राम पांडे

या सर्व विद्यार्थ्यांचे यश हे जोशी सर आणि पुरुषोत्तम कोरान्ने सर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, अनघा देव यांच्यासह माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर व प्राथमिक विभाग प्रमुख कीर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.