‘छात्र प्रबोधन ‘ ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय हस्तलिखित स्पर्धेत बाल शिवाजी शाळा यशस्वी
ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘तुम्हीच संपादक व्हा !’ ही राज्यस्तरीय हस्तलिखित स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या १५ वर्षांपासून शाळा सातत्याने या स्पर्धेत यशस्वी रित्या सहभागी होत आहे. या वर्षी सुद्धा या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. विदयार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ भरारी ‘ या हस्तलिखिताला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
या हस्तलिखित स्पर्धेत एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले होते. या हस्तलिखिताची संपादिका कांचन कवडे व सहसंपादिका ईश्वरी डांगे ह्या होत्या. ‘ भरारी’ चे मुखपृष्ठ जान्हवी तायडे तर मलपृष्ठ रोहन बोरसे ह्यांनी तयार केले. मुख्यचित्रे जान्हवी तायडे, अनुराग शेकोकार, रोहन बोरसे ह्यांनी तयार केले. यात समाविष्ट साहित्याचे लेखन ईश्वरी डांगे, पयोष्णी देशमुख, सुहानी निनाळे, सायली इंगळे, राजविर तारापूरे ह्यांनी आपल्या कल्पकतेतून शब्दबद्ध केले. हस्तलिखित सजावट सायली इंगळे, ईश्वरी डांगे ह्यांनी केली.
यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.वैशाली पाटील व सौ. किर्ती खपली ह्यांनी मार्गदर्शन केले. ‘तुम्हीच संपादक व्हा’ या राज्यस्तरीय हस्तलिखित स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘ भरारी ‘ च्या गटाला पुस्तक रूपाने पारितोषिके देण्यात आली. तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन शाळेला गौरविण्यात आले. या भावी लेखकांचे व चित्रकारांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव,सचिव श्री. विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव,शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका व कर्मचारी यांनी केले.