कौतुक सोहळा
कौतुक सोहळा : दिनांक १३ ऑगस्ट २०१६ रोजी आमदार रणधीर सावरकर, शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे , माध्यमिक शिक्षण विभाग अकोला चे शिक्षणाधिकारी श्री प्रकाशजी मुकुंद व प्रसिध्द समुपदेशक श्री मनोज केळकर मुंबई यांचे उपस्थितीत माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ‘कौतुक सोहळ्याचे ‘ विशेष आयोजन करण्यात आले .
या प्रसंगी मनोजजी केळकर यांनी विध्यार्थ्यांना ‘शिकण्यातील आनंद ‘ या विषयी मार्गदर्शन केले . तसेच शिक्षिकांसाठी ‘ शिकविण्यातील आनंद ‘ या विषयी मार्गदर्शन केले.