“ऑपरेशन सिंदूर एक शौर्यगाथा आणि आत्मनिर्भतेचे प्रतीक”- मा. श्री. अविनाश मुठाळ.

ब्राह्मणसभा संचालित बाल शिवाजी शाळेत दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी “ऑपरेशन सिंदूर : एक शौर्यगाथा व आत्मनिर्भर भारत” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. भारतीय वायुसेनेतील निवृत्त विंग कमांडर व राष्ट्रपती पदक प्राप्त मा. श्री. अविनाश मुठाळ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सखोल प्रस्तुतीतून विद्यार्थ्यांसमोर ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी, लष्करी रणनीती, भारतीय वैज्ञानिक सामर्थ्य, तसेच भारतीय सैन्यदलांची भूमिका प्रभावीपणे मांडली गेली.

कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांनी केले. सौ. वसुंधरा मुठाळ यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच मुख्याध्यापिका सौ. जळमकर आणि श्रीमती चोपडे यांचे विशेष योगदान लाभले. सुत्रसंचालनाची जबाबदारी सौ. रेणुका भाले यांनी निभावली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.